spot_img
spot_img
spot_img

तडीपार आदेशाचा भंग; पिंपरीत धारदार कोयत्यासह तरुण अटकेत

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

तडीपार आदेश लागू असतानाही पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत प्रवेश करून धारदार कोयता जवळ बाळगणाऱ्या तरुणाला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी दुपारी महादेव मंदिराजवळ, हिंदुस्तान अँटिबायोटिक कंपनीच्या मोकळ्या मैदानात करण्यात आली.

पोलिसांनी तौसिफ अब्दुल हाफिज चौधरी (वय २३, रा. लालटोपी नगर, पिंपरी) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौधरी याला पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी एक वर्षासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून तडीपार केले होते.

तडीपार आदेश असतानाही कोणतीही कायदेशीर लेखी परवानगी न घेता त्याने शहरात प्रवेश केला. त्याचबरोबर घातक शस्त्र बाळगण्यास मनाई असलेल्या कालावधीत त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता आढळून आला. दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो थांबलेला असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!