spot_img
spot_img
spot_img

प्रामाणिक पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल; COEP प्रशासनाच्या कारवाईने खळबळ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह COEP मधील कथित गैरकारभारावर बातमी केल्याप्रकरणी एबीपी माझाचे प्रामाणिक पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली असून, पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

COEP परिसरातील विद्यार्थ्यांच्या समस्या आणि महाविद्यालयातील कथित गैरप्रकाराबाबत बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर COEP प्रशासनाच्या तक्रारीवरून पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या प्रकरणातील गुन्ह्याची नेमकी कलमे आणि पोलिस तपासाची अधिकृत माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्य समोर आणणे हा पत्रकारितेचा धर्म असून, त्यासाठी पत्रकारावर गुन्हा दाखल करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रकार मंदार गोंजारी यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.

या प्रकरणामुळे पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शैक्षणिक संस्थांमधील कथित गैरप्रकार यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिस तपासानंतर या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!