spot_img
spot_img
spot_img

‘टेक फॉर गुड’ ही परिषद डिजिटल युगात दिशादर्शक – डॉ. सुधीर कुमार मारवा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘टेक फॉर गुड’ ही परिषद डिजिटल युगात दिशादर्शक आहे. या परिषदेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर समाजोपयोगी परिवर्तनासाठी झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या उद्योग पूरक धोरणामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत देश वेगाने प्रगती करत आहे. नवीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांबरोबरच युवा अभियंते आणि संशोधकांना या क्षेत्रात खूप संधी उपलब्ध होत आहेत. याचा उपयोग आपले उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी आणि देशाच्या विकास दरात वृद्धि करण्यासाठी अभियंत्यांनी करून घ्यावा असे मार्गदर्शन केंद्रीय मंत्रालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वरिष्ठ अधिकारी डॉ. सुधीर कुमार मारवा यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयईईई पुणे सेक्शनच्या तांत्रिक प्रायोजकत्वाने तसेच आयईईई सिग्नल प्रोसेसिंग सोसायटी, पुणे चॅप्टर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘टेक फॉर गुड : बिल्डिंग अ बेटर डिजिटल वर्ल्ड’ या संकल्पनेवर आधारित १० व्या आयईईई आयसीसीयूबीईए २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप सत्रात डॉ. मारवा यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. सुधीर कुमार मारवा, श्रीनिवास कुलकर्णी, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, प्रा. डॉ. सुदीप थेपडे, विभाग प्रमुख डॉ. सोनाली पाटील, डॉ. अश्विनी वझे, डॉ. मेघना लोखंडे व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई
यांच्या मार्गदर्शनाखाली ही आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली.
या परिषदेला देश विदेशातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि उद्योग प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या परिषदेत संगणकशास्त्र, कम्युनिकेशन, कंट्रोल, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि डिजिटल तंत्रज्ञानावर या विषयावर चर्चासत्र झाले.
या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी संशोधकांना उत्कृष्ट संशोधन योगदानासाठी बेस्ट पेपर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
कीनोट सेशन्समध्ये श्रीनिवास कुलकर्णी यांनी ऑटोनॉमस एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यापुढे होणाऱ्या आयसीसीयूबीईए परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी प्रा. डॉ. सुदीप थेपडे आणि टीम यांच्याकडे सेरेमोनियल बॅटन हँडओव्हरद्वारे सोपविण्यात आली.
सूत्र संचालन डॉ. अश्विनी वझे यांनी केले, तर आभार डॉ. मेघना लोखंडे यांनी मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!