spot_img
spot_img
spot_img

विशेष विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे, ३५ येथील इयत्ता पाचवी ते सातवीच्या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी निगडी येथील कामायनी मेंटल हॅंडीकॅप स्कूलला भेट देऊन तेथील विशेष विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात व आनंदात साजरा केला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी बंधुभाव प्रेम,आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.यावेळी विद्यार्थ्यांनी विशेष विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण अनुभवले.तसेच ‘निसर्गाचे रक्षण ही आपली जबाबदारी’ हा संदेश देत झाडाला राखी बांधून निसर्गाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक,सचिव व मार्गदर्शक मा.डॉ. गोविंदराव दाभाडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमात कु. संस्कृती चव्हाण,कु. स्वरा,कु. वेदिका कोशिरे व कु.आरोही गायकवाड यांनी मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी कामायनी मेंटल हॅंडीकॅप स्कूलच्या मुख्याध्यापिका ताटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊटर श्री.कैलास कोशिरे सर व गाईडर सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे रक्षाबंधनाचा हा उपक्रम सामाजिक जाणीव,समतेची भावना आणि निसर्गप्रेमाचा सुंदर संगम ठरला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!