शबनम न्यूज | प्रतिनिधी
जुलूस-ए-मोहम्मदिया कमिटी ट्रस्ट, पिंपरी-चिंचवडच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद शहरात उत्साह, भक्तिभाव आणि ऐक्याच्या वातावरणात साजरी झाली.
पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत काढलेल्या भव्य मिरवणुकीत चिमुकल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. शहरातील अनेक भागांत हिंदू व मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीचे स्वागत केले.
निगडी, ओटा स्कीम, रूपीनगर, आकुर्डी, चिंचवड, कुदळवाडी, चिखली, जाधववाडी, थरकवाडी, पॉवर वस्ती, लांडेवाडी, भोसरी, बालाजीनगर, नेहरूनगर, संत तुकारामनगर, मोरवाडी, वाकड, काळाखडक, थेरगाव, पवनानगर, काळेवाडी, पिंपरी कॅम्प, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी आदी भागांतून मुस्लिम बांधव मिरवणुकीद्वारे सुन्नी उलेमा कौन्सिलच्या धर्मगुरूंसमवेत पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आले. तेथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड जुलूस समितीचे अध्यक्ष रमजान अत्तार, उपाध्यक्ष नासीर शेख, सचिव हाजी अकबर मुल्ला, खजिनदार मुश्ताक अहमद शेख, सलीम मेमन, युसूफ रज्जाक कुरेशी, माजी अध्यक्ष युसूफ कुरेशी, झिशान सय्यद, हाजी गुलाम रसूल, शहाजी अत्तार, हबीब शेख, फारूक इनामदार, माजी शिक्षण सभापती फजल शेख, शहाबुद्दीन शेख, हाजी इद्रीस मेमन, अजहर खान, शकरुल्ला पठाण, कमरुद्दीन तांबोळी, गुलामगौस सिद्धिकी, वाहीद कुरेशी, याकूब खान, नजीर वाघू, हजरत पटेल, जाकीर शेख यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी पिंपरी येथे उत्तर प्रदेशातील प्रमुख प्रवचनकार हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मुख्तारूल हसन (बगदादी साहेब किबला, शेखुल हदीस, दारुल हक्क) यांचे प्रवचन झाले. त्यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली
यावेळी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात हातभार लावणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, माजी महापौर आझम पानसरे (सामाजिक क्षेत्र), व्ही. एम. कबीर, शकरुल्ला पठाण, झिशान सय्यद, ताजुद्दीन तांबोळी, जुलूस-ए-मोहम्मदिया कमिटी ट्रस्ट (सामाजिक), जब्बार शेख (औद्योगिक), डॉ. जावेद शेख (रुग्णसेवा), अहमद हसन खान, हाजी मुस्तफा खान (शैक्षणिक), गुलाम अली भालदार (सामाजिक व पत्रकारिता) यांचा समावेश होता.
यावेळी सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मिरवणुकीत आकर्षक देखावे सादर केले. अनेक ठिकाणी पाणी, सरबत आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.





Total Users : 216431