थेरगाव : साईराज सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळ, थेरगाव यांच्या वतीने मंडळाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ संभाजी दादा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली जश्ने ईद-ए-मिलाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते लालाभाई तांबोळी, कुचेकर मेजरसाहेब, मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील जगताप, कार्याध्यक्ष इसाक शेख, सेक्रेटरी अशोक सातपुते, तसेच हनुमंत सुरवसे, सुरेश शिंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने नागरिकांना फळे व शरबत वाटप करण्यात आले , तसेच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देण्यात आला. विविध धर्मीय नागरिकांनी एकत्र येत कार्यक्रमात सहभाग घेतल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि नागरिकांमध्ये एकोप्याची भावना वाढीस लागावी, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.






Total Users : 216041