spot_img
spot_img
spot_img

नवलाख उब्र रोडवर गांजासह तरुणाला अटक; १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत अटक केली. आरोपीकडून ३३२ ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण १ लाख २६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप शांताराम तुळवे (वय ३६, रा. करंजविहीरे, ता. खेड) हा २४ ऑगस्ट रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास नवलाख उब्र रोडवरील श्री दत्त मंदिराजवळील मोकळ्या जागेत संशयास्पदरीत्या आढळून आला.

पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्या ताब्यात ३३२ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत १ लाख २६ हजार रुपये असून, गांजा ठेवलेली पिशवीसह वजन ३३८ ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याच्याकडील व्हेस्पा दुचाकी (एमएच १४ एलसी ५५२३) जप्त करण्यात आली.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार भोजणे व सहायक पोलीस फौजदार रावण करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!