पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव दाभाडे : आईसोबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाला दगड, काठी आणि हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी पिता-पुत्रासह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ विष्णू आटोळे (वय २०) हे २५ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास जैन इंग्लिश स्कूलसमोर नगरपरिषदेची घंटागाडी दुरुस्त करीत होते. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या आईसोबत वाद घालत असल्याचे दिसल्याने सौरभ हे वाद सोडवण्यासाठी गेले.
यावेळी आरोपींनी फोन करून आणखी काही जणांना बोलावून घेतले. त्यानंतर सौरभ यांना दगड, काठी व हाताने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत सौरभ यांना दुखापत झाली.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात संजय किसन हनवरे (वय ५०) आणि सचिन संजय हनवरे (वय २५) यांच्यासह आणखी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ११८ (१), १२५ (अ), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस फौजदार वाघ व पोलीस हवालदार कळसाईत करीत आहेत.





Total Users : 215891