spot_img
spot_img
spot_img

एटीएममध्ये हातचलाखी; कार्ड बदलून ३० हजार रुपये लंपास

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

खराबवाडी : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाची नजर चुकवून अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर पिन क्रमांकाचा वापर करून खात्यातून ३० हजार रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार खराबवाडी येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र कुमार रामजी तिवारी (वय ५९) हे २४ ऑगस्ट रोजी दुपारी खराबवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र, पैसे निघत नसल्याने त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांना बॅलन्स तपासण्यास सांगितले.

तिवारी हे बॅलन्सची पावती घेत असताना आरोपीने हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले. त्यानंतर पिन क्रमांकाची माहिती मिळवून संबंधित खात्यातून ३० हजार रुपये काढून घेतले.

याप्रकरणी तिवारी यांच्या फिर्यादीवरून दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोगले करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!