spot_img
spot_img
spot_img

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १६ (रावेत, किवळे, मामुर्डी) येथील नागरिकांच्या विविध समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने ‘आमदार आपल्या दारी – संवाद, सेवा, समर्पण’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रावेत येथील समीर लॉन्स येथे गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हा उपक्रम पार पडला.

या उपक्रमात नागरिकांना शासकीय योजना, शासकीय दाखले, रेशन कार्ड यांसह विविध शासकीय कामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जनसामान्यांच्या तक्रारी, महापालिकेशी संबंधित प्रश्न, वीज, पाणी, ड्रेनेज आदी नागरी समस्यांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी, या उद्देशाने महापालिकेचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपक्रमस्थळी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या तक्रारींसोबत संबंधित कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले होते.

‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या न मारता आपल्या परिसरातच समस्या मांडण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!