पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
कासारसाई-कुसगाव रोडवरील वनविभागाच्या जागेत दारूच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान दगडाने मारहाण करून खुनात झाले. हनुमंत सोपान शितोळे यांचा डोक्यात व छातीत दगडाने मारहाण करून खून केल्याची घटना रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी जयवंता भगवंत तिडके (५०, रा. कासारसाई) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शितोळे आणि आरोपी यांच्यात दारू पिल्यानंतर वाद झाला. यावेळी मयताने आरोपीला मारहाण करून त्याचा हात पिरगळल्याने आरोपी संतप्त झाला. रागाच्या भरात त्याने घटनास्थळी पडलेला दगड उचलून शितोळे यांच्या डोक्यात व छातीत मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मयुर जयवंत शितोळे (३०) यांच्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५९४/२०२६, बीएनएस कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांचा तपास सुरू असून, घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी व इतर बाबींचा तपास केला जात आहे.





Total Users : 215596