spot_img
spot_img
spot_img

सांगवीत सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा कडक वॉच; ३ टोळ्यांतील २३ जणांवर मोक्का, ९ जणांवर तडीपार कारवाई

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

आगामी ईद-ए-मिलाद, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सांगवी पोलिसांनी सराईत व समाजविघातक प्रवृत्तीच्या गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील तब्बल २३ सराईत आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, हे आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच दोन सराईत आरोपींवर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

याशिवाय सात सराईत आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यास मदत होणार असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होणार आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी परिसरात संशयास्पद हालचाल किंवा समाजविघातक प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी व त्यांच्या पथकाने केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!