spot_img
spot_img
spot_img

विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्त कार्यालयाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी, युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा कार्यालयाचे उद्घाटन सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा या पदावर श्री. धीरज पाटील यांची दि. २७ मे २०२६ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात आले असून, त्याचे फलकाचे अनावरण व फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष शाखेचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि समर्पित भावनेने काम करण्याच्या सूचना दिल्या.

कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, विविध विभागांचे पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच विशेष शाखेतील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!