spot_img
spot_img
spot_img

पिंपळे सौदागरमध्ये शिवसेनेची ‘घोंगडी बैठक टप्पा ०५’ उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने ‘घोंगडी बैठक टप्पा ०५’ ही बैठक पिंपळे सौदागर, चिंचवड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत संघटन विस्तारासह पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर विशेष चर्चा करण्यात आली.

या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, महानगरप्रमुख राजेश फलके तसेच चिंचवड विधानसभा प्रमुख बापू कातळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीचे नियोजन शिवसेना सोशल मीडिया टीमचे जिल्हाप्रमुख सुदर्शन देसले यांच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, अधिकाधिक युवक आणि नागरिकांना शिवसेनेच्या संघटनेशी जोडणे तसेच पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पक्षात नव्याने सहभागी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात बूथ पातळीपासून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस महेश पाटील, प्रदीप मोरे, हितेश उपाध्याय, विशाल सोपने, दर्शन बोरसे, प्रवीण गायकवाड, अनिल पाटील, मनोज राजमाने, महेंद्र पटेल, संजय ब्राह्मणभट, अभिषेक देशपांडे, योगेश पगारे, योगेश पाटील, निलेश सोनवणे, मयूर भावसार, भूपेंद्र बडगुजर यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटन विस्ताराला गती देत आगामी काळात शिवसेनेची ताकद अधिक वाढविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!