शबनम न्यूज | प्रतिनिधी
श्री बापूआण्णा कातळे स्पोर्ट्स फाऊंडेशन, दत्तनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आजादी चषक २०२६’ या दहाव्या पर्वातील भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट क्रिकेट कौशल्याचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यानंतर विजेत्या, उपविजेत्या तसेच तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेत यशवंत भाऊ पंचांगे संविधान ग्रुप संघाने प्रथम क्रमांक पटकावत आजादी चषकावर आपले नाव कोरले. रियल स्ट्रेंथ ११, पुणे संघाने द्वितीय क्रमांक मिळवला, तर माळीनगर शिवानी ११, देहुगाव संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेमुळे परिसरातील युवा खेळाडूंना आपले क्रिकेट कौशल्य दाखविण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी सांघिक भावना, शिस्त आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
पारितोषिक वितरण समारंभाला भूपेंद्र पटेल, राजू आखाडे, पवार काका, राजू तरलोचन, यशवंत पाचांगे, संदीप तरस, ज्ञानेश्वर शेलके, बापूआण्णा कातळे, स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संभाजी थेऊरकर, प्रमोद पोळ, विनोद पोळ, तुषार शिंदे, धीरज शिंदे, गणेश जुनवणे, अक्षय येवते, उमेश नायडू, साजिद ताबोळी यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी, सभासद आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विजेता व उपविजेता संघांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे आयोजक, पंच, स्वयंसेवक, प्रायोजक आणि क्रिकेटप्रेमी नागरिकांचे आभार मानण्यात आले.
युवा पिढीने क्रीडा क्षेत्रात प्रगती करावी आणि त्यांना योग्य संधी व व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भविष्यातही अशा क्रीडा स्पर्धांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, असा निर्धार आयोजकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आला.





Total Users : 215416