spot_img
spot_img
spot_img

मनाई आदेश झुगारून लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र पोलिसांनी शस्त्र बाळगण्यास मनाई केलेला आदेश लागू असतानाही लोखंडी कोयता जवळ बाळगणाऱ्या १९ वर्षीय तरुणावर उत्तर महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत तानाजी रोहीले (वय १९, रा. खालुंब्रे, ता. मावळ) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास खालुंब्रे येथील वाघीरे यांच्या मालकीच्या मोकळ्या शेताजवळ आरोपी लोखंडी कोयता बाळगून आढळून आला. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून १७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टदरम्यान शस्त्रे व हत्यारे बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपीने आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१चे पोलिस कर्मचारी केशव रावसाहेब चेपटे यांनी फिर्याद दिली. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!