पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव दाभाडे : रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. तिच्या बहिणीलाही किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला.
हा अपघात शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील मामासाहेब खांडगे (फ्लोरा सिटी) सोसायटीसमोरील रस्त्यावर घडला. महिला फिर्यादी व तिची बहीण साक्षी कांबळे या सीआरपीएफ कॅन्टीनमधून सामान घेऊन मोटारसायकलवरून जात होत्या. त्या रस्ता ओलांडत असताना वडगावच्या दिशेने येणाऱ्या MH १४ HT ८६९६ क्रमांकाच्या दुचाकीवरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात फिर्यादीच्या डाव्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून साक्षी कांबळे यांच्या हातापायांना किरकोळ दुखापत झाली. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर आरोपी दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Total Users : 215416