शबनम न्यूज | प्रतिनिधी
रहाटणी परिसरातील आदिनाथ कॉलनी आणि जय भवानी चौक, अष्टविनायक कॉलनी येथील नागरिकांच्या विविध समस्यांची नगरसेवक सागर कोकणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
आदिनाथ कॉलनी येथील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वीज डीपीमुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत नगरसेवक सागर कोकणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर डीपी लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, जय भवानी चौक, अष्टविनायक कॉलनी येथील रस्त्यावर पावसामुळे गट्टू खचून मोठे खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणीही प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने खड्डे दुरुस्त करून रस्ता नागरिकांसाठी सुरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे आपले प्राधान्य असल्याचे नगरसेवक सागर कोकणे यांनी सांगितले. प्रभागातील प्रत्येक समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कार्यवाही आणि त्यानंतरही सातत्याने पाठपुरावा करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





Total Users : 215612