spot_img
spot_img
spot_img

जुन्या भांडणाचा राग; पेट्रोल पंपावर कामगारावर लोखंडी हत्याराने हल्ला

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

हिंजवडी : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना नेरे येथील पेट्रोल पंपावर घडली.

ही घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता दत्तवाडी, नेरे-कासारसाई रोडवरील जाधव पाटील पेट्रोलियम, इंडियन ऑईल कंपनी येथे घडली. ओमकार हनुमंत जाधव (वय ३०) हे पेट्रोल पंपावर काम करीत असताना आरोपी गोपाळ दादा साळुंखे (वय २६) हा दोन-तीन साथीदारांसह पांढऱ्या रंगाच्या होंडा कारमधून तेथे आला.

आरोपीने सहा महिन्यांपूर्वी फिर्यादीचा विठ्ठल नावाच्या व्यक्तीसोबत झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग काढत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने हातातील लोखंडी हत्याराने जाधव यांच्या उजव्या मनगटावर व डाव्या अंगठ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

याप्रकरणी गोपाळ साळुंखे व त्याच्या दोन-तीन साथीदारांविरुद्ध हिंजवडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!