spot_img
spot_img
spot_img

अज्ञात चारचाकीची स्कुटीला धडक; चालक पसार

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

मोशी : चाकणहून भोसरीकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाने स्कुटीला जोरदार धडक देऊन चालक पसार झाल्याची घटना भारतमाता चौकाजवळ घडली. या अपघातात स्कुटीस्वार गंभीर जखमी झाला असून वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

ही घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास भारतमाता चौकाच्या अलिकडे घडली. लखन रघुनाथ पवार (वय ३५) हे ज्युपिटर स्कुटीवरून चाकणहून भोसरीच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या स्कुटीला धडक दिली.

अपघातानंतर संबंधित चारचाकी चालक घटनास्थळावर न थांबता पसार झाला. या धडकेत लखन पवार यांच्या तोंडाला, डोक्याच्या मागील बाजूस तसेच दोन्ही हातांना दुखापत झाली. तसेच स्कुटीच्या मागील व डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी लखन यांचे भाऊ रामु रघुनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या वाहनाचा व चालकाचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडसे व पोलीस हवालदार ठोंबरे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!