spot_img
spot_img
spot_img

मुलींसाठी मोफत फार्मसी शिक्षणाची संधी; लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रवेश सुरू

पिंपरी चिंचवड पुणे : प्रतिनिधी युनूस खतीब

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक योजनेंतर्गत मुलींसाठी मोफत फार्मसी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आळंदी-मरकळ रोड, सैनिकी शाळा, फुलगाव येथील लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षण शुल्क माफीचा लाभ मिळणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत मुलींसाठी फार्मसी शिक्षण मोफत असून, प्रवेशासाठी CET आवश्यक नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तर मुलांसाठी वार्षिक २५ हजार रुपये शुल्कात प्रवेशाची सुविधा उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.

लोकसेवा अल्पसंख्याक योजनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी या योजनेचा मोठा फायदा होऊ शकतो.

प्रवेश व योजनेबाबत अधिक माहितीसाठी अफरोज सर – ८१४९५६७७७८ किंवा भंडारी मॅडम – ९२२६२२०३९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!