spot_img
spot_img
spot_img

गुरुद्वारा–वाल्हेकरवाडीतील नागरिकांच्या प्रश्नांसाठी ऐश्वर्या तरस, राजेंद्र तरस यांचा पुढाकार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गुरुद्वारा–वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस आणि युवा नेते राजेंद्र तरस यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गुरुद्वारा–वाल्हेकरवाडी परिसरातील काही महत्त्वाच्या अडीअडचणींबाबत माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे यांची भेट घेण्यात आली. साळुंखे यांनी यापूर्वी या भागाचे नेतृत्व केले असल्याने परिसरातील स्थानिक प्रश्न, प्रलंबित कामे आणि नागरिकांच्या अडचणींची त्यांना असलेली माहिती पुढील कार्यवाहीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, नाचिकेत बालश्रम परिसरातील नागरिकांकडून तक्रार प्राप्त होताच ऐश्वर्या तरस आणि राजेंद्र तरस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत संबंधित प्रश्नांबाबत महानगरपालिकेकडे यापूर्वी करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती घेण्यात आली.

नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांचे लवकरात लवकर निराकरण व्हावे, यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास यावेळी नागरिकांना देण्यात आला.

नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या प्रत्यक्ष समजून घेणे, संबंधित महानगरपालिका यंत्रणेकडून त्यांचे निराकरण करून घेणे आणि प्रश्न सुटेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणे, हीच आपली कार्यपद्धती असल्याचे नगरसेविका ऐश्वर्या तरस आणि युवा नेते राजेंद्र तरस यांनी स्पष्ट केले.

परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित नागरी कामांना प्राधान्य देऊन त्यावर ठोस कार्यवाही करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नागरिकांच्या प्रश्नांना आता अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!