spot_img
spot_img
spot_img

सुरक्षाविना उंचीवर काम; शेडवरून पडून तरुणाचा मृत्यू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

उंचीवर काम करताना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध न करून दिल्याने शेडवरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कासारवाडी येथील ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात घडली. याप्रकरणी दापोडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस बजावली आहे.

ही घटना १८ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी विठ्ठल महादू साबळे (वय ६५, रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पत्र्याच्या शेडवरील लाईटिंग काढण्याचे काम सुरू होते. मात्र, उंचीवर काम करण्यासाठी आवश्यक सेफ्टी बेल्ट, सुरक्षा शूज, हेल्मेट तसेच सुरक्षित शिडी यांसारखी साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. काम पूर्ण झाल्यानंतर खाली उतरत असताना राहुल साबळे यांचा तोल गेला आणि ते उंचीवरून खाली पडले.

या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राम इंगळे आणि अब्दुल गुलाब बेग (दोघेही रा. काळेवाडी) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे.

दापोडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!