शबनम न्यूज | प्रतिनिधी
सुनेला माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने मनगटाजवळ वार केल्याची घटना काळेवाडीतील नढेनगर परिसरात घडली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २० मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास ओंकार कॉलनी, नढेनगर येथे घडली. याबाबत ५५ वर्षीय महिलेने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सून आणि तिची आई घरी आल्या होत्या. सुनेला माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून फिर्यादीशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर दोघींनी फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, आरोपी महिलेच्या आईने जवळील चाकूने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ वार करून जखमी केले. तसेच, ‘तुला साडी फेडून मारेन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर दोन्ही महिला सोलापूरच्या दिशेने निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी २६ वर्षीय महिला आणि कविता आबासाहेब देवकर (वय ५५) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.





Total Users : 215130