spot_img
spot_img
spot_img

घराचा दरवाजा उघडा पाहून चोरी; ९२०० रुपयांचे चांदीचे दागिने लंपास

शबनम न्यूज | प्रतिनिधी

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत कपाटातील ९ हजार २०० रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना चिंचवड येथील सह्याद्री सोसायटीत उघडकीस आली.

ही चोरी १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा या कालावधीत चिखली रोड परिसरातील सह्याद्री सोसायटीत घडली. याप्रकरणी ७७ वर्षीय महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी घरात नसताना घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील चांदीचे दागिने चोरून नेले.

घटना लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील व पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!