spot_img
spot_img
spot_img

दिघीतील हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का; चौघांवर गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हॉटेलमध्ये ग्राहकांना हर्बल व तंबाखूजन्य हुक्का उपलब्ध करून देताना तसेच आवश्यक सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई ट्री टाऊन हॉटेल, मॅग्झीन रोड, दिघी येथे करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलमध्ये ग्राहकांना हर्बल हुक्का, टोबॅको हुक्का, स्नॅक्स, पाणी व शीतपेय उपलब्ध करून देण्यात येत होते. हुक्क्यासाठी फॉइल पेपरवर जळता कोळसा ठेवण्यात आला होता. हॉटेलमध्ये धुराचे प्रमाण वाढल्याचे तसेच हुक्क्याचा वास सर्वत्र पसरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

हुक्क्यासाठी वापरण्यात येणारा जळता कोळसा ग्राहकांच्या ये-जा करण्याच्या ठिकाणी ठेवण्यात आल्याने त्याच्या ठिणग्यांमुळे हॉटेलमधील लाकडी टेबल व खुर्च्यांना आग लागण्याची तसेच मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

तसेच हॉटेलमध्ये स्वतंत्र धूम्रपान कक्ष (स्मोकिंग झोन) तयार न करता ग्राहकांना जेवणाच्या टेबलवरच हुक्का पुरविल्याचे आढळून आले.

याप्रकरणी अक्षय तापकीर, समशेर मनसूर अहमद (२९), किशन कुमार श्रवण साहनी (२०) आणि अरबाज इम्रान अहमद (२०) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वरे यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!