शबनम न्यूज | प्रतिनिधी
विक्रीसाठी बेकायदा गांजा बाळगणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ किलो १०३ ग्रॅम गांजा आणि मोबाईल असा एकूण ६५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई २१ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास व्हीटीपी बांधकाम साइटजवळ, महाळुंगेकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई मिनीनाथ सूर्यभान पवार यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश राजेंद्र पवार (वय २४, रा. माण) हा संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो १०३ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच एक मोबाईल असा एकूण ६५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी गणेश पवार याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.




Total Users : 226652