spot_img
spot_img
spot_img

पिंपळे गुरवमध्ये २ लाखांचा चरस जप्त; तरुणाला अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विक्रीसाठी चरस बाळगणाऱ्या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने पिंपळे गुरव परिसरात अटक केली. त्याच्याकडून १७८ ग्रॅम ३७० मिलीग्रॅम चरस, दोन मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण २ लाख ४ हजार ५९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई २० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिवगणेश चौक, पगारे हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष बिभीषण सपकाळ यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रथमेश ऊर्फ सनी राजेश खैरे (वय २५, रा. पिंपळे गुरव) याच्या ताब्यात चरस आढळून आला. चौकशीत हा चरस विक्रीसाठी हिमाचल प्रदेशातील मनाली-कसोल येथून आणल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

आरोपीने मित्रांसह मनाली-कसोल येथे जाऊन तेथील वेदराज नावाच्या व्यक्तीकडून चरस विक्रीसाठी आणल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीसह इतर साथीदारांचा तपास सुरू आहे.

आरोपी प्रथमेश खैरे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव व पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!