शबनम न्यूज | प्रतिनिधी
काळेवाडी, रहाटणीसह विजयनगर, तापकीरनगर, भारतमाता चौक, नढेनगर, कोकणेनगर, पाचपीर चौक, आदर्शनगर व ज्योतिबानगर परिसरातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही या रस्त्यांवरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेने तातडीने खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे. दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.





Total Users : 215079