शबनम न्यूज | प्रतिनिधी
तापकीरनगर परिसरातील मोरया कॉलनी, इंदिरा गांधी वसाहत तसेच ज्योतिबा पादुका कॉलनीजवळील काही स्ट्रीट पोल नागरिकांच्या घरांच्या दरवाजासमोर आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नगरसेविका अर्चना विनोद तापकीर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान घरांच्या प्रवेशद्वारांसमोर असलेल्या स्ट्रीट पोलमुळे नागरिकांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हे स्ट्रीट पोल योग्य आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना अर्चना तापकीर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नागरिकांच्या दैनंदिन वावरात अडथळा निर्माण होऊ नये तसेच भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
“नागरिकांची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची आहे. घरांच्या दरवाजासमोर आलेले स्ट्रीट पोल नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना ते योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असे नगरसेविका अर्चना विनोद तापकीर यांनी सांगितले.





Total Users : 214888