शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘आपला म्युझिकल ग्रुप’च्या वतीने देशभक्तीपर गीतांची सुरेल मैफिल आणि माजी सैनिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात ‘एक दुनिया एक दुल्हन’, ‘हम उस देश के वासी हैं’, ‘हे राष्ट्र प्रेषितांचे’, ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘इतनी शक्ती हमें देना दाता’, ‘ऐ मेरे वतन के लोगो’, ‘हे मेरे प्यारे वतन’, ‘देश रंगीला’, ‘म्यानातून उसळे’, ‘मेड इन इंडिया’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘संदेसे आते हैं’ आदी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कराओकेच्या साथीने कलाकारांनी सुरेल आवाजात गीते सादर करत उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागवली.
या कार्यक्रमात आयोजक अनिल घाडगे, उमा मेनन, विद्या हजारेपाटील, रणजीत पाटील, भूषण देवधर, शशिकांत वाढते, विजय कांबळे, भारती सातव, छाया अय्यर, स्नेहलता चव्हाण, सुषमा वनारसे, हरिश शरणागत, विकास जगताप, संगीता खरवडे आदी कलाकारांनी सहभाग घेतला.
माजी सैनिकांचा विशेष सन्मान
देशासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. रघुनाथ गंगाराम जाधव (निवृत्त सुभेदार), शंकरराव श्रीपती पिसाळ (निवृत्त सारजंट), महावीर यशवंत जाधव (निवृत्त हवालदार), बाबाराव त्रिंबक मोटे (निवृत्त हवालदार) आणि शंकर हनुमंत कदम (निवृत्त हवालदार) यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तसेच आंतरराष्ट्रीय केशभूषा क्षेत्रात थायलंड येथे पुरस्कार मिळविल्याबद्दल मंगेश उर्फ यश लोहोर यांचा, पुणे डिजिटल मीडियाचे पत्रकार व संपादक राजू परदेशी यांचा सन्मान करण्यात आला. ‘आपला म्युझिकल ग्रुप’चे कलाकार विकास जगताप आणि संगीता खरवडे यांना कलाकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यास उद्योजक सागर मोरे, उद्योजक नवनाथजी कोलते, सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप, पत्रकार व समीक्षक विकास पाटोळे, अशोक गायकवाड, आनंद गायकवाड आणि माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी बाळकृष्ण दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित दोडके आणि मोहन खटावकर यांनी केले. साऊंडची जबाबदारी महेश, व्हिडिओग्राफी शीला लाहीगुडे आणि फोटोग्राफी दत्ता लोहोर यांनी सांभाळली. देशभक्तीपर गीतांनी भारावलेल्या वातावरणात आणि माजी सैनिकांच्या सन्मानाने कार्यक्रमाचा समारोप उत्साहात झाला.





Total Users : 214736