spot_img
spot_img
spot_img

जप्त वाहनांचा २१ ऑगस्टला जाहीर ई-लिलाव

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या आणि वाहन कर व इतर शासकीय थकबाकी न भरल्याने ताब्यात घेण्यात आलेल्या सहा वाहनांचा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे.
या वाहनांचा ई-लिलाव शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुकांना www.mstcindia.co.in या संकेतस्थळावरून ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

ई-लिलावासाठी पात्र असलेल्या सहा वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे सूचना फलकावर तसेच संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. लिलावातील वाहनांची विक्री (भंगार) करण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. लिलाव प्रक्रियेत Registered Vehicle Scrapping Facility (RVSF) संस्थांनाही सहभागी होता येणार आहे.

दरम्यान, संबंधित वाहनमालक, चालक अथवा हितसंबंधित व्यक्तींनी लिलावाच्या दिनांकापूर्वी वाहनावरील थकबाकी व संबंधित रक्कम भरून वाहन सोडवून घेण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
या जाहीर ई-लिलावाबाबत अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!