spot_img
spot_img
spot_img

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची संधी; पूर्वप्रशिक्षणासाठी मोफत प्रशिक्षण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय स्थलसेना, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांना Services Selection Board (SSB) मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक रोड, नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी 21 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासोबतच निवास व भोजनाची सुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण वर्गात प्रवेशासाठी उमेदवाराने कोणतीही एक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. Combined Defence Services Examination (CDSE-UPSC) किंवा National Defence Academy Examination (NDA-UPSC) उत्तीर्ण होऊन SSB मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार, तसेच NCC Special Entry साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असलेले उमेदवार पात्र राहतील. याशिवाय Technical Graduate Course साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असलेले तसेच University Entry Scheme साठी SSB कॉल लेटर असलेले किंवा SSB साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असलेले उमेदवारही या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे 18 सप्टेंबर 2026 पर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावरील DSW Portal → Resources → PCTC Nashik → SSB-69 या विभागातील प्रवेश अर्ज डाउनलोड करून त्याच्या दोन प्रती भरून सोबत आणाव्यात. तसेच संबंधित पात्रता प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, SSB पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. ई-मेल : training. [email protected], दूरध्वनी : 0253-2451032, तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 यावर संपर्क साधता येईल.

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणे जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या मोफत SSB पूर्वप्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!