शबनम न्यूज | प्रतिनिधी
महिलांचे हक्क, सुरक्षितता आणि उज्ज्वल भवितव्य यासाठी युवक-युवतींचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने ‘छात्रों की गूंज – Make Way, The Girls Are Coming’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहून महिलांच्या हक्कांसह विविध मुद्द्यांवर संवाद साधणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून पुण्यातील AISSMS College of Engineering, RTO मेट्रो स्टेशनजवळ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, पोस्टरवर दिलेल्या QR कोडद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमात डॉ. मनीषा गरुड, (अध्यक्ष, डॉक्टर सेल) यांनी युवकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे, त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि भविष्यात महिलांना अधिक सक्षम संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला युवक-युवती तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




Total Users : 239127