पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
चिंचवड : चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत एका ५८ वर्षीय व्यक्तीच्या ताब्यातून ३४६ ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल असा एकूण १८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.२२ वाजता जुना जकातनाका येथून वाल्हेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत, आरएमडी इंटरनॅशनल स्कूलसमोरील सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी संजय हरिभाऊ कांबळे (वय ५८, व्यवसाय मजुरी, रा. मोरया कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या ताब्यात ३४६ ग्रॅम वजनाचा, अंदाजे १८ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे आढळून आले.
चौकशीदरम्यान कांबळे याने सदर गांजा त्याचा मुलगा शरण कांबळे याने विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील तपासात गांजाचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.
याप्रकरणी अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस शिपाई गोविंद देवराव डोके यांनी फिर्याद दिली. त्यावरून चिंचवड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेरखाने करीत आहेत.





Total Users : 214686