spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत पार्क केलेली मोटारसायकल चोरीला

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

देसाई हॉस्पिटल परिसरातील ज्योती बिल्डिंग येथे पार्क करून लॉक केलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ ऑगस्ट रोजी पहाटे २ ते सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान सम्राट चौक, पिंपरी परिसरात घडली. फिर्यादी अश्विनी दिलीप बंसल यांनी त्यांची मोटारसायकल ज्योती बिल्डिंगसमोर पार्क करून लॉक केली होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या इराद्याने सदर मोटारसायकल चोरून नेली.

या प्रकरणी १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४५ वाजता संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!