spot_img
spot_img
spot_img

शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष; आयटी डेव्हलपरला ९.३८ लाखांचा गंडा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

 शेअर बाजारात गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आयटी डेव्हलपरची तब्बल ९ लाख ३८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सोनल जगन्नाथ नाईक यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम संजय जोशी (वय ३१, व्यवसाय-आयटी डेव्हलपर) यांना आरोपींनी ‘Jullius Baer Investors Hab Y10’ आणि ‘Julius Baer Help & Support Y1111 Payment Group’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करून आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर जोशी यांनी एकूण ९ लाख ३८ हजार रुपये जमा केले.

काही काळानंतर वेबसाइटवर नफा व मूळ रक्कम दिसत असल्याने ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे काढता आले नाहीत. त्यानंतर वेबसाइटवरील ‘Withdrawal’ पर्यायच हटविण्यात आला. पैसे काढण्याबाबत विचारणा केली असता आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. अखेर संपर्क साधणाऱ्या व्यक्तींनी फोन व मेसेजला प्रतिसाद देणे बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे जोशी यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!