पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
झोपण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी सळईने डोक्यात, तोंडावर व पायावर चार ते पाच जोरदार वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना आळंदी येथे घडली. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रदक्षिणा रोडवरील भाई मनोहर कोतवाल गोदी कामगार धर्मशाळा ट्रस्ट परिसरात ही घटना घडली. आरोपी अनंत दिंगबर तौर (वय अंदाजे ३०, रा. शेलगाव दांडी, ता. माजलगाव, जि. बीड) हा हातात लोखंडी सळई घेऊन तेथे आला. त्याने मागील दिवशी झोपण्याच्या कारणावरून झालेल्या शिवीगाळीचा जाब विचारत वाद घातला. त्यानंतर चिडलेल्या आरोपीने लोखंडी सळईने तरुणावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.




Total Users : 226350