spot_img
spot_img
spot_img

१३ उपाध्यक्षांसह भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आगामी राजकीय घडामोडी आणि संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) केंद्रीय संघटनरचनेत मोठे फेरबदल केले आहेत. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी जाहीर केलेल्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीत काही महत्त्वाच्या नेत्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर त्यांचे हे महत्त्वपूर्ण पुनरागमन मानले जात आहे.

माजी राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आपले पद कायम राखले आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे मानले जाते.

या फेरबदलातील सर्वाधिक चर्चेचा निर्णय म्हणजे भाजपच्या आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांची या पदावरून गच्छंती. त्यांच्या जागी छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांची राष्ट्रीय आयटी सेलच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपच्या प्रसारमाध्यम विभागाची जबाबदारी खासदार अनिल बलूनी यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे.

या नव्या संघटनात्मक फेरबदलातून भाजपने आगामी राजकीय आव्हाने आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक रणनीती अधिक बळकट करण्याच्या दिशेने पावले उचलल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!