spot_img
spot_img
spot_img

गांजा सेवन करताना एकास अटक; चाकण उत्तर पोलिसांची कारवाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चाकण गावच्या हद्दीत निर्मलाताई पिंगळे लॉ कॉलेजजवळ गांजाचे सेवन करणाऱ्या एका व्यक्तीवर चाकण उत्तर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी राजकुमार रामउग्रह चव्हाण (वय ३८, रा. वासुली फाटा जवळ, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. लोहरोली, पोस्ट कोठरा, ता. बस्ती, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.२० वाजण्याच्या सुमारास चाकण गावच्या हद्दीत निर्मलाताई पिंगळे लॉ कॉलेजजवळ आरोपी गांजा या अंमली पदार्थाचे कागदी सिगारेटच्या सहाय्याने सेवन करताना आढळून आला. तो उष्णता देऊन गांजाचा धूर तोंडातून व नाकाद्वारे सोडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी पोलीस शिपाई अक्षय दिगंबर सांडभोर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६६७/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, महिला पोलीस शिपाई गोसावी यांच्यासह पोलीस पथकाने कारवाई केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!