पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथे यू-टर्न घेताना दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला. हा अपघात जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सीआरपीएफ गेट क्रमांक दोनजवळ रविवारी (दि. १६) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडला.
या प्रकरणी रियाज मेहमूद शेख (वय ३०, रा. कोथरूड, पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल सुंदर मुंडे (वय २२, रा. शिक्रापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुचाकीवरून वडगावकडून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जात असताना आरोपी मुंडे हा त्याच्या दुचाकीवरून मामासाहेब खांडगे नगर कमानीसमोर यू-टर्न घेत होता. यावेळी त्याने फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात फिर्यादीला किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनि. खामगळ करीत आहेत.





Total Users : 214173