पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ०.२९८ किलो अर्थात २९८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे १५ हजार रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास टी-ब्लॉक, एमआयडीसी भोसरी परिसरातील पवना इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सच्या भिंतीलगतच्या फुटपाथवर करण्यात आली.
आर्यन विजय धिवार (वय १९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) हा गांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या जवळ बाळगताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील ०.२९८ किलो गांजा जप्त करून त्याला अटक केली.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तळेकर व पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले करीत आहेत.





Total Users : 214176