पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
जुनी सांगवीतील संगमनगर परिसरात गांजा सेवन करताना दोन तरुणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून गांजा ओढण्यासाठीचे साहित्य आणि चारचाकी स्वीफ्ट कार असा एकूण सुमारे ६० हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संगमनगर, नॅशनल स्कूलजवळ, लुक्स हेअर कटिंग दुकान परिसरात करण्यात आली.
आशिष गोविंद वाघमारे (वय २१, रा. पिंपळे गुरव) आणि रितेश रविंद्र लांडगे (वय २३, रा. नवी सांगवी) हे दोघे स्टॅश-प्रो सिगारेट व बाँगमध्ये गांजा भरून त्याचे सेवन करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडील गांजा सेवनाचे साहित्य तसेच स्वीफ्ट कार असा एकूण ६०,०२५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.




Total Users : 226716