spot_img
spot_img
spot_img

येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे राज्याचे अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधारसेवेचे महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी व कारागृह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन श्री. वारके यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पित सेवाभाव हीच राष्ट्रसेवेची खरी ओळख असून, प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडाव्यात, असे आवाहन केले.
कारागृह व सुधारसेवा विभागामार्फत राज्यातील कारागृहांची सुरक्षितता व शिस्त कायम राखण्याबरोबरच बंदींच्या सुधारणा व पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बंदींच्या पुनर्वसनासोबतच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कारागृह व सुधारसेवा विभागाच्या उद्दिष्टांप्रती आपली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प केला.

यावेळी महाराष्ट्र कारागृह विभागातील उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त सुभेदार संजीव सखाराम घाणेकर, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार
संजय सखाराम तलावरे, भायखळा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विकास हनुमंत रजनळकर,येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे हवालदार
महेश लक्ष्मण गडनाईक यांना पुष्पगुच्छ व प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी कौतुक केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!