spot_img
spot_img
spot_img
spot_img

महापौर रवि लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीत भव्य रक्तदान शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रवि लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी १६ ऑगस्ट २०२६ रोजी भोसरी परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भव्य रक्तदान शिबिरासह ST स्मार्ट कार्ड (NCMC) नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बहुउद्देशीय सभागृह, पी.सी.एम.टी. चौक, गव्हाणे वस्ती, मोशी येथे होणार आहे.

रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी “एकदान हेच श्रेष्ठदान” हा संदेश देण्यात आला असून, रक्तदान करणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षक भेटवस्तूची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना ST स्मार्ट कार्ड (NCMC) नोंदणी शिबिराचा मोफत लाभ घेता येणार आहे.

महापौर रविभाऊ लांडगे मित्र परिवार, भोसरी यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!