spot_img
spot_img
spot_img
spot_img

डुप्लिकेट चावीने दुकान उघडून २८ हजारांचे शर्ट लंपास

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दुकानाची डुप्लिकेट चावी वापरून शटर उघडत आत प्रवेश केला आणि दुकानातील तब्बल २८ हजार रुपये किमतीचे शर्ट चोरून नेल्याचा प्रकार पिंपरीतील कपडा बाजारात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश राजेश जवराणे (वय ३३, रा. पिंपरी) यांचे कपडा बाजारातील बी-१९/०५ येथे ‘प्रगती ड्रेसेस एन एक्स’ हे कपड्यांचे दुकान आहे. दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी राजेश नंदलाल लुंडवानी (वय ४७, रा. पिंपरी) याने जवळील डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप उघडले.

त्यानंतर शटर उघडून दुकानात प्रवेश करून २८ हजार रुपये किमतीचे शर्ट चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०६ तसेच चोरीसंदर्भातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!