spot_img
spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये ७३ हजारांचा गांजा जप्त; १९ वर्षीय तरुणाला अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवडमधील बिजलीनगर रोड परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत १ किलो ४५४ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे ७३ हजार ४०० रुपये असून, याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मोरया हौसिंग सोसायटीच्या गेटसमोर, बिजलीनगर रोड, वेताळनगर, चिंचवड येथे सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

यश सचिन गवळी (वय १९, रा. वेताळनगर, चिंचवड) हा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत आढळून आले. त्याच्याकडून १,४५४ ग्रॅम गांजा, वजनकाटा, रिकाम्या प्लास्टिक पिशव्या आणि काळ्या रंगाची बॅग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान सदर गांजा तुळजापूर येथील सोनारी परिसरातील ‘महाराज’ नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याचे आरोपीने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस शिपाई प्रतिक संभाजी कवडे यांच्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बळीप व पोलीस उपनिरीक्षक दुधे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!