शबनम न्यूज | प्रतिनिधी
रुपीनगर परिसरात हनुमान मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. ८) सकाळी घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहीत कुमार रामेश्वर यादव (वय ३०) यांनी त्यांच्या मित्राच्या नावावर असलेली मोटारसायकल रुपीनगर पोलीस चौकीपासून काही अंतरावर हनुमान मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर उभी केली होती.
सकाळी १०.२५ ते १०.४० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून यादव यांच्या संमतीशिवाय मोटारसायकल लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.



