spot_img
spot_img
spot_img
spot_img

कै. विलास आप्पा काळभोर यांच्या १२व्या पुण्यस्मरणानिमित्त अनाथ व दिव्यांग मुलांसाठी सामाजिक उपक्रम

पिंपरी-चिंचवड : कै. विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या १२व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कै. विलास आप्पा काळभोर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अजय भाऊ काळभोर यांच्या संकल्पनेतून अनाथ व दिव्यांग मुलांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने ८ ऑगस्ट २०२६ रोजी दोन सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सायंकाळी ६ वाजता झूंज दिव्यांग संस्था, आश्रम प्रशिक्षण केंद्र, इस्कॉन टेम्पल रोड, गणेशनगर, रावेत येथे अनाथ व दिव्यांग मुलांना गरजेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.

त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता इमॅन्युअल ऑर्फनेज, बिलीव्हर्स चर्च, संचेती शाळेजवळ, तुळजाई कॉलनी, थेरगाव, चिंचवड येथे अनाथ मुलांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला.

या दोन्ही उपक्रमांमध्ये प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

कै. विलास आप्पा काळभोर यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेत गरजू, अनाथ व दिव्यांग मुलांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत पुण्यस्मरणाचा दिवस समाजोपयोगी उपक्रमातून साजरा केल्याबद्दल श्री. अजय भाऊ काळभोर यांचे उपस्थितांनी मनापासून अभिनंदन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!