पिंपरी-चिंचवड : कै. विलास आप्पा काळभोर यांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आकुर्डी येथील संत बाबा मोनी साहेब वृद्धाश्रम, गुरुद्वाराजवळ येथे काळभोर कुटुंबीयांच्या वतीने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सोमनाथ विलास काळभोर, शीतल काळभोर, ऋतुराज काळभोर आणि आराध्या काळभोर यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना जेवणाचे अन्नदान करण्यात आले. आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जपत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास निखिल दळवी, महेश व्यवहारे, विजय काळभोर, स्वप्निल बनकर, बबलू शेख, किशोर शिंदे, कृष्णा माने, शारदा जाचक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी काळभोर कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले. तसेच कै. विलास आप्पा काळभोर यांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन करण्यात आले.



